Join us

India vs England 2nd Test: भारताची डावाने पराभव टाळण्यासाठी धडपड

India vs England 2nd Test: इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 16:23 IST

Open in App

लॉर्ड्स - इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांनी 7 बाद 396 धावांवर डाव घोषित केला. सॅम कुरनला ( 40) हार्दिक पांड्याने बाद करताचा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने डाव घोषित केला. ख्रिस वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला. वोक्सने 177 चेंडूंत 17 चौकार लगावत 137 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे धावांहून अधिक आघाडी घेतल्यानंतर 26 सामने जिंकले आहेत, तर सहाच लढती अनिर्णीत राहिल्या आहेत. त्यामुळे भारताची पराभव टाळण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा