Join us  

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर इंग्लंड समर्थक समालोचकांची झाली अशी दशा, Video

India vs England 2nd Test :  भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:38 PM

Open in App

India vs England 2nd Test :  भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं चौथ्या दिवशी विक्रमी १०० धावांची भागिदारी करून विजयाचा पाया रचला पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजनं या कसोटीत ८ विकेट्स घेतल्या, तर शतकवीर लोकेश राहुलला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. लॉर्ड्सवर भारतीय खेळाडू विजयाचा जल्लोष करत होते, तर दुसरीकडे इंग्लंड समर्थक समालोचकांची अवस्था पाहा कशी झाली होती... 

मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर पाकिस्तानी पत्रकार फिदा; म्हणाली, तू वर्ल्ड क्लास आहेस!

भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या १२९, रोहित शर्माच्या ८३, विराट कोहलीच्या ४२, रवींद्र जडेजाच्या ४० व रिषभ पंतच्या ३८ धावांच्या जोरावर ३६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं जो रूटच्या नाबाद १८०, जॉनी बेअरस्टो ५७ आणि रोरी बर्न्स ४९ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ३९१ धावा करून २७ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराजनं ४, इशांत शर्मानं ३ आणि मोहम्मद शमीनं २ विकेट्स घेतल्या. 

विराट कोहली 'फाटक्या तोंडाचा'; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं बेताल वक्तव्य, नेटिझन्सकडून समाचार!

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे ( ६१) व चेतेश्वर पुजारा ( ४५) यांनी विक्रमी १०० धावांची भागीदारी करून टीम इंडियाला सावरले. त्यानंतर पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह ( ३४*) व मोहम्मद शमी ( ५६*) यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. भारतानं ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजनं इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवला अन् लॉर्ड्सवर एकच जल्लोष साजरा झाला. पण, इंग्लंड समर्थक समालोचकांना काय बोलावे हेच सुचेना झाले होते.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइंग्लंड
Open in App