India vs England : मोहम्मद सिराज तू वर्ल्ड क्लास आहेस!; पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बास कौतुक करता काही थांबेना!

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला.

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज यानं अवघ्या ७ कसोटी सामन्यांत जगाला त्याच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. भारतानं मिळवलेल्या १५१ धावांच्या विजयात सिराजचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या या कामगिरीचे फक्त भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातूनही कौतुक होत आहे.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू ते पत्रकार मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानची प्रसिद्ध क्रीडा पत्रकार जैनब अब्बास ( Zainab Abbas) ही पण सिराजची फॅन बनली आहे. तिनं एक व्हिडीओ पोस्ट करून सिराजला वर्ल्ड क्लास गोलंदाज संबोधले आहे.

जैनब अब्बास म्हणाली, मोहम्मद सिराज हा वर्ल्ड क्लास गोलंदाज बनत चालला आहे. ज्या प्रकारे त्यानं ऑस्ट्रेलियात दबदबा गाजवला आणि आता लॉर्ड्सवर इंग्लंडची दैना केली. त्याच्याकडे गती आहे, चेंडूवर ताबा ठेवण्याचे कौशल्य आहे, तो चेंडूला बाहेरच्या दिशेनं घेऊन जातो आणि त्याची लाईन लेंथ कमाल आहे.

जैनब म्हणाली भारताकडे १०-१५ वर्षांपूर्वी असे जलदगती गोलंदाज नव्हते. आता भारत या जलदगती गोलंदाजांमुळे अव्वल दर्जाचा संघ बनला आहे. ती म्हणाली, जसप्रीत बुमराहचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इशांत शर्मानंही चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीला विसरून चालणार नाही. शमीनं फलंदाजीतही दमदार कामगिरी करून दाखवली आणि त्याला बुमराहनं चांगली साथ देत सामनाच पलटला.

''सध्याच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला गोलंदाजीसोबत फलंदाजीही करता आली पाहिजे. कसोटी क्रिकेटसाठी हे गरजेचं आहे. भारतीय संघात संघर्ष करण्याची ताकद आहे. हा संघ कधीच हार मानत नाही,