India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड दौ-यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा लॉर्ड्स येथे वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 18:04 IST2018-08-11T18:03:49+5:302018-08-11T18:04:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England 2nd Test: Bowler, Groundsman and Dealer, Arjun Tendulkar in different roles | India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत

India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत

मुंबई - भारत आणि इंग्लंड दौ-यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा लॉर्ड्स येथे वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. कसोटी सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंसोबस सराव सत्रात गोलंदाजाच्या भूमिकेत दिसलेला अर्जुन सामन्याच्या दुस-या दिवशी ग्राऊंड्समन्ससोबत खेळपट्टी वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. सामन्याच्या तिस-या दिवशी अर्जुन लॉर्ड्स स्टेडियमबाहेर आणखी एका रूपात दिसला.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कसोटी संघातील सदस्य असलेला अर्जुन श्रीलंका दौऱ्यावरून थेट इंग्लंडमध्ये दाखल झाला. अर्जुनने श्रीलंका दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला बळी टिपला आणि तो प्रसिद्धीत आला. त्यानंतर इंग्लंड दौ-यावरील त्याची प्रत्येक हालचाल लक्षवेधी ठरत आहे. शनिवारी अर्जुन चक्क स्टेडियमबाहेर डिजिटल रेडिओ विकताना दिसला. 



भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने अर्जुनसह फोटो ट्विट करून रेडिओ खरेदी करण्याचा आवाहन केले. तत्पूर्वी, अर्जुनने भारतीय संघासोबत सराव केला. शुक्रवारी पावसाच्या सततच्या व्यत्ययात पार पडलेल्या या सामन्यात अर्जुनने ग्राऊंड्समन्सला सहकार्य केले होते. 
 

 

Web Title: India vs England 2nd Test: Bowler, Groundsman and Dealer, Arjun Tendulkar in different roles