India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चहूबाजूंनी टीका होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 16:48 IST2018-08-11T16:47:51+5:302018-08-11T16:48:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England 2nd Test: 'Big B' come for the defense of India | India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात

India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चहूबाजूंनी टीका होत आहे. विशेषतः भारतीय फलंदाजांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या बचावासाठी बॉलिवूडमधील 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना मैदानावर उतरावे लागले. 

एडबॅस्टन कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला, तर लॉर्ड्सवरही भारतीय फलंदाजांची हाराकिरी सुरूच आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 35.2 षटकांत 107 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय फलंदाजावर चौफेर टीका सुरू झाली. मात्र, कसोटी संघाचा सदस्य नसलेल्या रोहित शर्माने चाहत्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला. याच खेळाडूंनी भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून दिले आहे, त्यामुळे त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, असे आवाहन रोहितने केले. 



रोहितच्या या आवाहनावर सहमती दर्शवून अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाचे मनोबल उंचावणारा मॅसेज शेअर केला आहे. 
 

Web Title: India vs England 2nd Test: 'Big B' come for the defense of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.