India vs England, 2nd Test Day 1 : तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांनी एन्ट्री होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईत खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांना BCCIनं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता रेकॉर्डेड टाळ्या वाजवण्याची गरज नाही. प्रेक्षकांच्या स्वागतासाठीही BCCIनं एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. BCCI लिहिलं की, प्रिय चाहत्यांनो आम्ही तुम्हाला मिस करत होतो आणि आता तुमचे आम्ही स्वागत करत आहोत. चेपॉकवर तुम्हाला टीम इंडियासाठी चिअर करताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.''  अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली
पाहा व्हिडीओ...
टीम इंडियात तीन महत्त्वाचे बदलकर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही, याची उत्सुकताही संपली आहे. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज नदीम आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली असून त्यांच्याजागी कुलदीप, अक्षर पटेल ( पदार्पण) आणि 
मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे.
टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज 
इंग्लंडचा संघ ( England's playing XI for 2nd Test) :  - जो रुट ( कर्णधार) , मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, बेन फोक्स ( यष्टिरक्षक), डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन.