India vs England, 2nd Test : अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली

India vs England, 2nd Test Day 1 : गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकलेला अक्षर पटेल ( Axar Patel) आजच्या सामन्यातून टीम इंडियात कसोटी पदार्पण करत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 09:10 AM2021-02-13T09:10:03+5:302021-02-13T09:11:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd Test : Axar Patel making his Test debut, Jasprit Bumrah rested: India won the toss and decided to bat first   | India vs England, 2nd Test : अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली

India vs England, 2nd Test : अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test Day 1 : गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकलेला अक्षर पटेल ( Axar Patel) आजच्या सामन्यातून टीम इंडियात कसोटी पदार्पण करत आहे. टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला विश्रांती दिली असून मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याचे पुनरागमन होत आहे. इंग्लंडनं पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानं टीम इंडियाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंडनंही आजच्या सामन्यात संघात चार बदल केले आहेत.


निराशाजन कामगिरीनंतरही टीम इंडियानं रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला संघात कायम ठेवले आहे. तो आणि शुबमन गिल ( Shubman Gill) उद्याच्या सामन्यात संघाच्या डावाची सुरुवात करतील. रोहितनं २०१९-२०मध्ये कसोटीत सलामीला खेळताना दोन शतक आणि एक द्विशतक झळकावलं होतं. गिलनं चेन्नई कसोटीत २९ व ५० धावा केल्या होत्या.  चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील.  फिरकी विभागात आर अश्विन याचे स्थान पक्के आहे, त्याच्या मदतीला वॉशिंग्टन सुंदर असेल अशी अपेक्षा होती, परंतु कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. प्रेमातही 'दादा'नं दाखवलेली डेअरिंग; वैर असलेल्या कुटुंबातील मुलीसोबत सौरव गांगुलीनं थाटला संसार!

यांच्या जोडीला अक्षर पटेल हा तिसरा फिरकीपटू म्हणून संघात असेल, अक्षर पटेल २०१४पासून कसोटी पदार्पणाची वाट पाहत होता. जलदगती गोलंदाजांच्या ताफ्यात एक बदल झाला आहे. इशांत शर्माच्या जोडीला या सामन्यात मोहम्मद सिराज दिसेल. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० Sexiest खेळाडूंमध्ये पाच भारतीय; शेवटचं नाव पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!

टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज 


इंग्लंडचा संघ ( England's playing XI for 2nd Test) :  - जो रुट ( कर्णधार) , मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, बेन फोक्स ( यष्टिरक्षक), डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन.

Web Title: IND vs ENG, 2nd Test : Axar Patel making his Test debut, Jasprit Bumrah rested: India won the toss and decided to bat first  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.