बटलरनं साधला मोठा डाव; टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला बॅटर

कॅरेबियन स्टारला मागे टाकत जोस बटलर ठरला अव्वल, टीम इंडियाविरुद्ध जे कुणाला जमलं नाही ते इंग्लंडच्या कॅप्टननं करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 00:26 IST2025-01-26T00:21:51+5:302025-01-26T00:26:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd T20I Jos Buttler becomes highest run getter against India in T20Is | बटलरनं साधला मोठा डाव; टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला बॅटर

बटलरनं साधला मोठा डाव; टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला बॅटर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England Jos Buttler becomes highest run getter against India in T20Is : भारत दौऱ्यावर असलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर एकटा लढताना दिसला. त्याला अन्य खेळाडूंची साथ न मिळाल्यानं पाहुणा संघ टीम इंडियासमोर हतबल ठरताना दिसतोय. एका बाजूला इंग्लंडच्या संघासाठी पुढचा सामना 'करो वा मरो' असा झाला असताना दुसऱ्या बाजूला बटलरनं मात्र एक मोठा डाव साधलाय. टीम इंडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कुणाला जमलं नाही ते जोस बटलरन करून दाखवलं आहे. तो भारतीय संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध गाठला ६०० धावांचा आकडा

चेन्नईच्या एम चिदम्बरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघानं निर्धारित २० षटकात १६५ धावा केल्या होत्या. यात जोस बटलरनं ३० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ४५ धावांचे योगदान होते. या खेळीसह त्याने भारतीय संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. 

आधी कॅरेबियन खेळाडूच्या नावे होता हा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड याआधी कॅरेबियन स्टार बॅटर निकोलस पूरनच्या नावे होता. पूरन याने भारतीय संघाविरुद्ध ५९२ धावा कुटल्या आहेत. त्याला मागे टाकत जोस बटलर टीम इंडियाविरुद्ध ६०० धावांचा आकडा पार करणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. बटलरन आतापर्यंत टीम इंडियाविरुद्ध खेळलेल्या २१ सामन्यात ३५.९४ च्या सरासरीसह १४६.९ च्या स्ट्राइक रेटनं ६११ धावा कुटल्या आहेत. 

१५० सिक्सर मारण्याचा डावही साधला

चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ३ षटकारांसह जोस बटलर टी-२० क्रिकेटमध्ये १५० षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत रोहित शर्मा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत २१० षटकार मारले आहेत. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल १७३ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर असून युएईच्या ताफ्यातील मुहाम्मद वासीमच्या नावे १५८ षटकारांची नोंद आहे. 

Web Title: India vs England 2nd T20I Jos Buttler becomes highest run getter against India in T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.