IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट'

तो गोलंदाजीत छाप सोडून दुबईचं तिकीट मिळवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:27 IST2025-02-09T13:24:30+5:302025-02-09T13:27:20+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd ODI Jos Buttler won toss and opted to bat Yashasvi Jaiswal Out Virat Kohli In Kuldeep is rested so Varun Chakravarthy makes his debut | IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट'

IND vs ENG, 2nd ODI : वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची संधी! विराटही 'फिट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कटकच्या मैदानातील दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीची भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची संधी देण्यात आलीये. जड्डूनं वरुन चक्रवर्तीला वनडे कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. कुलदीप यादवला विश्रांती देत वरुणला संघात स्थान मिळाले असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तो गोलंदाजीत छाप सोडून दुबईचं तिकीट मिळवणार का? ते पाहण्याजोगे असेल.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहितची मैदानात उतरताच फिफ्टी, पण.. 

भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी आधी फक्त दोन वनडे सामने उरले आहेत. उर्वरित दोन सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये दिसणार का? हा मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मानं टॉसला मैदानात उतरताच फिफ्टी झळकावली. ५० व्या सामन्यात तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या खास सामन्यात भात्यातून तो किती धावा काढून दाखवणार? सातत्याच्या फ्लॉपशोचा सिलसिला होऊन तो नावाप्रमाणे हिटमॅन ठरणार का?  ते पाहण्याजोगे असेल.

 कोहलीचाही सुरुये संघर्ष

विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या वनडे सामन्याला मुकला होता. तोही धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. मोठ्या खेळीसह त्याला १४ हजार धावांचा खास पल्ला गाठण्याची संधी आहेत. तो या सामन्यातच मोठा डाव साधणार का? यावरही क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.

 भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.


इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद
 

Web Title: India vs England 2nd ODI Jos Buttler won toss and opted to bat Yashasvi Jaiswal Out Virat Kohli In Kuldeep is rested so Varun Chakravarthy makes his debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.