एडबॅस्टन - आर अश्विन आणि इशांत शर्मा हे गोलंदाजीत प्रभाव पाडत असताना शिखर धवनचे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पहिल्या कसोटीच्या दुस-या डावात इंग्लंडचा संघ स्वस्तात गुंडाळला जाईल अशी चिन्हे होती. मात्र, सॅम कुरन आणि आदिल रशीद यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. हे दोघेही वैयक्तीक 13 धावांवर असताना धवनने स्लीपमध्ये त्यांचा सोपा झेल सोडला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 44 धावांची भागिदारी केली.
इंग्लंडचा संघ 7 बाद 87 अशा बिकट अवस्थेत असताना कुरन आणि रशीद यांनी संघाला 7 बाद 131 धावांपर्यंत मजल मारून दिली. अंधुक प्रकाशामुळे तिस-या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.