Join us

India vs England, 1st Test : जाना था जापन, पण...!; रिषभ पंतचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल

India vs England, 1st Test : जो रूट ( Joe Root), बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि डॉम सिब्ली ...

By स्वदेश घाणेकर | Updated: February 6, 2021 16:20 IST

Open in App

India vs England, 1st Test : जो रूट ( Joe Root), बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि डॉम सिब्ली ( Dom Sibley) यांच्या फटकेबाजीमुळे भारतीय चाहते निराश झाले असले तरी रिषभ पंतनं ( Rishabh Pant) त्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पंत यष्टींमागून बडबड करताना सर्वांना पाहिला. तो गोलंदाजांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही बडबड ऐकून स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला हसू आवरेल तर खरं... दुसऱ्या दिवशीही रिषभ पंत मनोरंजन करताना दिसला. पण, यावेळी त्यानं स्वतःचं हसं करून घेतलं. इंग्लंडच्या फलंदाजानं मारलेला चेंडू रिषभच्या डोक्यावरून गेला, पण रिषभ तो टिपण्यासाठी पॉईंटच्या दिशेनं धावला. हे सर्व पाहून सारेच हसू लागले. विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स      बेन स्टोक्स आणि रूट या जोडीनं चौथ्या विकेटसाठी २२१ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. १२७व्या षटकात भारताला रूट व स्टोक्सची जोडी तोडण्यात यश आलं. बेन स्टोक्स ११८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावांवर माघारी परतला.   १००व्या कसोटीत जो रूटचा World Record!; सुनील गावस्कर यांचाही मोडला विक्रम

१५४व्या षटकात जो रूटची विकेट मिळवण्यात टीम इंडियाला अखेर यश आलं. रुटनं ३७७ चेंडूंत १९ चौकार व २ षटकार खेचून २१८ धावा चोपल्या, शाहबाज नदीमनं त्याला पायचीत केलं. इशांत शर्मानं सलग दोन चेंडूवर इंग्लंडला धक्के दिले, परंतु त्याला हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. भारताकडून इशांत, शाहबाज नदीम, आर अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडचे ८ फलंदाज माघारी परतले आहेत.  टीम इंडियाचं काही खरं नाही!; १६ वर्षांनंतर इंग्लंडनं करून दाखवला 'हा' भारी पराक्रम!

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतजो रूटबेन स्टोक्स