India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

India vs England, 1st test Day 2 : खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 11:19 AM2021-02-06T11:19:55+5:302021-02-06T11:20:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test : Nothing going to India's hands in the last 15 minutes, lose two DRS and droped Two Catches | India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजो रुटच्या १५० धावा अन् बेन स्टोक्सचे अर्धशतकइंग्लंडच्या ११६ षटकानंतर ३ बाद ३४० धावा

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची फटकेबाजी दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहे आणि त्याला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याचीही दमदार साथ मिळत आहे. रूटनं १५० धावांचा पल्ला पार केला, तर स्टोक्सनंही अर्धशतक झळकावून भारतासमोर मोठे आव्हान ठेवण्याच्या दिशेनं खेळ सुरू केला आहे. भारतीय गोलंदाज ही जोडी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना साजेशी साथ मिळताना दिसत नाही.  त्यात विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील ३६ चा आकडा याही सामन्यात दिसला. अवघ्या १५ मिनिटांत विराटनं दोन DRS गमावले, तर स्टोक्सचे दोन झेलही सुटले. माझं नाव वॉशिंग्टन...; यष्टिंमागून रिषभ पंतची सुरू होती बडबड, BCCI पोस्ट केला भन्नाट Video 

खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. त्यावर स्टोक्स धावांचे इमले रचत आहे. आर अश्विन, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांना दुसऱ्या दिवशीही विकेटसाठी संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवसाच्या १०८व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्स पायचीत असल्याची अपील झाली. विराटनं लगेच DRS घेतला, परंतु रिप्लेमध्ये चेंडू पॅडऐवजी स्टोक्सच्या ग्लोजला लागल्याचे दिसले आणि भारतानं हा रिव्ह्यू गमावला.  Non-stop Cricket : टीम इंडियाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा कोणाकोणाला भिडणार!


त्यानंतर पुढच्याच षटकात नदीमच्या गोलंदाजीवर रुटसाठी पायचीतची अपील झाली. नदीमनं सुरेख चेंडू फेकला होता, परंतु तो पॅडच्या वरच्या बाजूला लागला. तरीही विराटनं DRS घेतला आणि चेंडू यष्टींवरून जात असल्याचे रिप्लेत दिसले. हाही DRS भारताला गमवावा लागला.

त्यानंतर आर अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्सचा रिटर्न कॅच सुटला. स्टोक्सनं पुढे येऊन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रिटर्न कॅच येईल असे अश्विनलाही वाटले नव्हते आणि त्याच्याहातून झेल सुटला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराकडून स्टोक्सचा झेल सुटला.


 

Web Title: India vs England, 1st Test : Nothing going to India's hands in the last 15 minutes, lose two DRS and droped Two Catches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.