India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई 

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं ( Joe Root) कारकिर्दीतल्या १००व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करताना इतिहास घडवला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2021 04:11 PM2021-02-05T16:11:34+5:302021-02-05T16:12:56+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test : Joe Root is the first cricketer to score a century in his 98th, 99th and 100th Test | India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई 

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकर्णधार जो रुटचे खणखणीत शतक, इंग्लंड मजबूत स्थितीत१००व्या कसोटीत शतक करणारा पाचवा कर्णधार

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं ( Joe Root) कारकिर्दीतल्या १००व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करताना इतिहास घडवला. १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं या सामन्यात प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय घेतला. 

इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिब्ली ( Dom Sibley) आणि रोरी बर्न्स ( Rory Burns) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. पण, आर अश्विननं बर्न्सला माघारी पाठवले, त्यानतंर बुमराहनं डॅन लॉरेन्स ( ०) याला पायचीत केले आणि पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था २ बाद ६७ अशी झाली. जो रुट व डॉम सिब्ली यांनी शतकी भागीदारी करताना दुसऱ्या व तिसऱ्या सत्रावर वर्चस्व गाजवले.  जो रूटनं आतापर्यंत भारतात ७ कसोटी सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यातील किमान एका डावात तरी त्यानं ५० किंवा ५०+ धावा केल्या आहेत. जो रुटची भारतातील कसोटी सामन्यांतील कामगिरी ७३ व २०* ( नागपूर), १२४ व ४ ( राजकोट), ५३ व २५ ( वायझॅक), १५ व ७६ ( मोहाली), २१ व ७७ ( मुंबई), ८८ व ६ ( चेन्नई), १०१* (चेन्नई).

शंभराव्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाज
कॉली कॉवड्रे (इंग्लंड) 
जावेद मियाँदाद ( पाकिस्तान) 
गॉर्डन ग्रीनीज ( वेस्ट इंडिज)
अॅलेक स्टेवर्ट ( इंग्लंड) 
इंझमाम-उल-हक ( पाकिस्तान)  
रिकी पाँटिंग ( ऑस्ट्रेलिया)
ग्रॅमी स्मिथ ( दक्षिण आफ्रिका)  
हाशीम आमला ( दक्षिण आफ्रिका) 
जो रुट ( इंग्लंड)

पण, ९८, ९९  व १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा जो रुट हा जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. भारतात दाखल होण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटीत त्यानं शतकी खेळी केली होती.   


१००व्या कसोटीत शतक करणारा पाचवा कर्णधार


Web Title: India vs England, 1st Test : Joe Root is the first cricketer to score a century in his 98th, 99th and 100th Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.