Join us  

India vs England 1st Test: इशांतची विक्रमी कामगिरी, दिग्गजाला टाकले मागे

India vs England 1st Test: इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 6:29 PM

Open in App

एडबॅस्टन - इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले. उपहारानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला त्याने पहिल्याच षटकात यश मिळवून दिले. इंग्लंडच्या जोस बटलरला बाद करताना इशांतने डावातील चौथी विकेट घेतली. यासह त्याने भारताचे दिग्गज गोलंदाज बीएस चंद्रशेखर यांना पिछाडीवर टाकले.पहिल्या सत्रात इंग्लंडचे पाच फलंदाज अवघ्या 77 धावांवर माघारी परतले. फिरकीपटू आर अश्विनने तिस-या दिवशी दोन प्रमुख खेळाडूंना बाद केल्यानंतर जलदगती गोलंदाज इशांत शर्माने तीन बळी घेतले. इशांतने डेविड मलान, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांना बाद केले. उपहारानंतर बटलरचा अडथळा दूर करताना भारताला सातवे यश मिळवून दिले. या विकेटसह इशांतने कसोटी क्रिकेटमधील 243 वा बळी टिपला. त्याने चंद्रशेखर यांच्या 242 विकेट्सचा विक्रम मोडला. भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये इशांत सातव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत अनिल कुंबळे ( 619) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कपिल देव ( 434), हरभजन सिंग (417), आर अश्विन ( 323), जहीर खान ( 311) आणि बिशनसिंग बेदी ( 266) यांचा क्रमांक येतो.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडहरभजन सिंगकपिल देवआर अश्विनइशांत शर्मा