चेन्नई : ज्यो रुटची फिरकी माऱ्याला सामोरे जाण्याची क्षमता प्रभावित करणारी असून इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत, अशी कबुली इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दिली आहे.
स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले. इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत.’