Join us

India vs England 1st Test: लक्ष्य गाठू शकतो - ईशांत शर्मा

‘आमच्याकडे दमदार फलंदाजी क्रम असून आम्ही सकारात्मक आहोत. उद्या अखेरच्या दिवशी चांगली सुरुवात लाभल्यास विजयी लक्ष्य गाठू शकणार आहोत.’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 06:29 IST

Open in App

चेन्नई : ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशानंतर इंग्लंडविरुद्ध ४२० धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठू शकतो, असा विश्वास वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने सोमवारी व्यक्त केला. ३०० बळींचा टप्पा गाठणारा ईशांत म्हणाला, ‘आमच्याकडे दमदार फलंदाजी क्रम असून आम्ही सकारात्मक आहोत. उद्या अखेरच्या दिवशी चांगली सुरुवात लाभल्यास विजयी लक्ष्य गाठू शकणार आहोत.’ खेळपट्टीची साथ नसतानादेखील दोन दिवस आम्ही चांगला मारा केला. पहिल्या दिवशी पाटा ठरलेली ही खेळपट्टी चौथ्या दिवशी फिरकीला अनुकूल जाणवली. माझ्या स्वत:च्या गोलंदाजीत फार चढउतार आले. मात्र भारतीय उपखंडासह विदेशात कसा मारा करायचा याचा वेध घेऊ शकलो.’ 

मागच्या १३ वर्षांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे ईशांतने स्वत:च्या वाटचालीबद्दल सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइशांत शर्मा