IND vs ENG, Nitish Kumar Reddy Takes Stunning Catch As Varun Chakravarthy Gets Jos Buttler Watch Video : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाला अवघ्या १३२ धावांत रोखलं. अर्शदीपचा भेदक मारा अन् वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचा जलवा याशिवाय या सामन्यात युवा अष्टपैलू नितीशकुमार रेड्डीनं फिल्डिंगवेळी हवा केली. त्याने डाइव्ह मारून पकडलेल्या कॅचसह डोकेदुखी ठरत असलेल्या जोस बटलरला तंबूचा रस्ता दाखवण्यात मोलाचा वाटा उचलला. क्षेत्ररक्षणावेळी त्याने हवा केली. त्याचा हा झेल पाहून तुमच्या ओठांवर एकच नंबर रे भावा हे शब्द नक्कीच उमटतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ ढेपाळल्यावर बटलरनं लढवला किल्ला, मोठा फटका मारताना तो फसला
अर्शदीप सिंगनं आपल्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडल्यावर वरुण चक्रवर्तीनं मध्य फळीतील तगड्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. पण एका बाजूनं विकेट पडत असताना इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर एकटा लढला. त्याने अर्धशतक साजरे केले. ही खेळी आणखी पुढे नेण्याच्या इराद्याने तो मोठे फटकेबाजी करत होता. इंग्लंडच्या डावातील १७ व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पण षटकार मारल्यावर पुढच्या चेंडूवर तो फसला. सीमारेषेवर नितीशकुमार रेड्डीनं त्याचा कमालीचा झेल टिपला अन् त्याच्या स्फोटक इनिंगला ब्रेक लागला.
नितीशकुमार रेड्डीचा कमालीचा झेल
जोस बटलरची विकेट वरुण चक्रवर्तीच्या खात्यात जमा झाली असली तरी नितीशकुमार रेड्डीनं फिल्डिंगचा जो कमालीचा नजराणा पेश केला तो अविस्मरणीय असा होता. सिक्सर बसल्यावर वरुण चक्रवर्तीने इंग्लंडच्या बॅटरला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. पण यावेळी चेंडू पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगवागन होता. जोस बटलर त्यामुळे फसला. यातूनही बटलरने स्क्वेअर लेगच्या दिशनं मोठा फटका खेळला. पण नितीशकुमार रेड्डीने डाइव्ह मारत कमालीचा झेल घेत त्याचा प्रयत्न फसवा ठरवला.
बटलरची क्लास खेळी
इंग्लंडच्या संघाकडून कॅप्टन जोस बटरलनं ४४ चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडच्या संघाला टी-२० मालिकेतील पहिली लढाई १३० पारची करता आली. जर नितीशकुमार रेड्डीनं इंग्लंड बॅटरचा तो झेल टिपला नसता तर अखेरच्या षटकात तो टीम इंडियासाठी घातक ठरला असता. पण ही वेळच युवा क्रिकेटरनं येऊ दिली नाही.
Web Title: India vs England 1st T20I Nitish Kumar Reddy Takes Stunning Catch As Varun Chakravarthy Gets Jos Buttler Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.