India vs England, 1st T20I : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मोहम्मद शमी कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती. पण घरच्या मैदानातील लढतीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्याशिवायच टीम इंडिया मैदानात उतरली आहे.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.