Join us

अबतक ६०० विकेट्स! हा पल्ला गाठताना जड्डूनं लावला जेम्स अँडरसनच्या विक्रमाला सुरुंग

जड्डूनं गाठला ६०० विकेट्सचा पल्ला, तो आता या भारतीय दिग्गजांच्या पक्तींत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:44 IST

Open in App

Ravindra Jadeja Breaks James Anderson's All Time Record With Completes 600 International Wickets : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजानं मोठा डाव साधला आहे. अष्टपैलू खेळाडूनं पहिल्या वनडेत आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या खास पंक्तीत स्थान मिळवले आहे. एवढेच नाहीतर ही कामगिरी करताना त्याने इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनचा सर्वकालीन विक्रमालाही सुरुंग लावला आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जड्डूनं गाठला ६०० विकेट्सचा पल्ला, तो आता या भारतीय दिग्गजांच्या पक्तींत

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ६०० विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा पाचवा भारतीय गोलंदाज ठरलाय. त्याच्या आधी  अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग आणि कपिल देव या दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक बळी टिपले आहेत. इंग्लंडच्या डावातील ४७ व्या षटकात आदिल रशीदला बाद करत जड्डू या पक्तींत सामील झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

  • अनिल कुंबळे: ४०१ सामन्यात ९५३ बळी
  • रविचंद्रन अश्विन: २८७ सामन्यात ७६५ बळी
  • हरभजन सिंग: ३६५ सामन्यात ७०७ बळी
  • कपिल देव: ३५६ सामन्यात ६८७ बळी
  • रवींद्र जडेजा: ३२५ सामन्यात ६०० बळी

जडेजानं इंग्लंडच्या अँडरसनचा विक्रमही मोडला

जडेजाने ही खास कामगिरी करताना इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडीत काढलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आधी जेम्स अँडरसनच्या नावे होते. त्याने भारताविरुद्ध ४० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. जड्डूनं त्याचा हा विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंड विरुद्धच्या नागपूर वनडेत २ विकेट्स घेताच त्याने इंग्लंडच्या दिग्गजाचा सर्वकालिन विक्रम मागे टाकत अव्वलस्थानावर झेप घेतली. 

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

  • ४२ - रवींद्र जडेजा
  • ४० - जेम्स अँडरसन
  • ३७ - अँड्र्यू फ्लिंटॉफ
  • ३६ - हरभजन सिंग
  • ३५ - जवागल श्रीनाथ/ आर. अश्विन 
टॅग्स :रवींद्र जडेजाभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड