Join us

India vs England1st Test: रूटला बाद केल्यानंतर कोहलीने केले असे काही...

India vs England 1st Test: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या अँड्य्रू फ्लिंटॉफने टी-शर्ट काढून केलेल्या जल्लोषाला सौरभ गांगुलीने जशास तसे उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:16 IST

Open in App

बर्मिंगहॅम - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या अँड्य्रू फ्लिंटॉफने टी-शर्ट काढून केलेल्या जल्लोषाला सौरभ गांगुलीने जशास तसे उत्तर दिले. वन डे मालिकेतील विजयानंतर लॉर्डच्या ऐतिहासिक गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट उतरवले. इंग्लंड आणि भारत या संघांमधील मैदानावरील ठसन आजही सुरूच आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत याची प्रचिती आली. यावेळी ही ठसन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांच्यात पाहायला मिळाली. 

गांगुलीप्रमाणे विराटही आक्रमक आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी विराटने सुरेख क्षेत्ररक्षण करताना रूटला धावबाद केले आणि त्यांनतर त्याने रूटला डीवचण्याची क्रिया केली. 63व्या षटकातील तिस-या चेंडूवर जॉनी बेअरस्टोव्हने डाव्या बाजूला चेंडू टोलावला आणि तो अडवण्यासाठी कोहली धावला. त्याने एका हातावर स्वतःला बॅलेन्स करताना अश्विनच्या दिशेने थ्रो केला आणि रूट धावबाद झाला. त्यानंतर आनंद साजरा करताना कोहलीने इंग्लंडच्या कर्णधाराली डिवचले.. पाहा कोहलीने काय केले...  कोहलीचे हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच गाजले. भारताविरूद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवल्यानंतर रूटने हातातील बॅट खेळपट्टीवर टाकून आनंद साजरा केला होता आणि बुधवारी कोहलीने तसेच हावभाव करून रूटला डिवचले.  .

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडजो रूटक्रिकेटक्रीडा