Join us

India vs Englad 1st Test: फक्त दोन धावांत इंग्लंडचा संघ परतला तंबूत

India VS England : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सॅम कुरनला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले आणि इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांवर संपुष्टात आला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:49 IST

Open in App
ठळक मुद्देगुरुवारी फक्त दोन धावांची भर घालून इंग्लंडचा संघ तंबूत परतला.

बर्मिंगहॅम : आपल्या 1000व्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ दमदार कामगिरी करेल, असे क्रिकेट चाहत्यांना वाटले होते. पण गुरुवारी फक्त दोन धावांची भर घालून इंग्लंडचा संघ तंबूत परतला.

भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना नमत घेण्यास भाग पाडले. या सामन्यात आर. अश्विनने चार आणि मोहम्मद शमीने तीन बळी मिळवले. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची 9 बाद 285 अशी स्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त दोन धावांमध्य इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सॅम कुरनला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले आणि इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांवर संपुष्टात आला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद शामीविराट कोहलीदिनेश कार्तिक