Join us

India vs Engaland 2nd Test: शास्त्री गुरुजींच्या 'पोटा'वरून रंगली हास्य मैफल! 

India vs Engaland 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंड कसोटी मालिकेत साजेशी सुरूवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 09:14 IST

Open in App

लॉर्ड्स- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंड कसोटी मालिकेत साजेशी सुरूवात करता आली नाही. एडबॅस्टन कसोटीत त्यांना 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. लॉर्ड्स कसोटीसाठी भारतीय संघाने कसून सराव केला. भारतीय खेळाडूंचा नेटमधील सराव आणि नेटिझन्सची सोशल मीडियावरील फटकेबाजी गेल्या काही दिवसांत चांगलीच रंगात आली. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर सोशल मीडियावर पुन्हा एकदा हास्य मैफल रंगली. 

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरी लढत आजपासून सुरू होत आहे. या कसोटीत विजय मिळवून कमबॅक करण्याचा भारताचा निर्धार आहे. या कसोटीसाठी तयार केलेल्या खेळपट्टीची शास्त्रींनी पाहणी केली. ते खेळपट्टी पाहत असलेला फोटो BCCIने काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता. त्यावर नेटिझन्सनी शास्त्रींना टारगेट केले. खेळपट्टीपेक्षा शास्त्रींच्या 'सुटलेल्या पोटा'वर नेटिझन्सनी हास्य मैफल भरवली. खेळांडूप्रमाणे प्रशिक्षकांनीही Yo- Yo टेस्ट द्यायला हवी. असे खोचक सल्लेही शास्त्रींना देण्यात आले आहेत. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयक्रीडा