Join us  

India Vs Bangladesh, Latest News : इतिहास रचण्यापासून रोहित फक्त एक पाऊल दूर...

रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 6:57 PM

Open in App

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : भारताचा सलामीवीर रोहित शर्मानेबांगलादेशविरुद्धच्या संघाविरुद्ध शतक झळकावले. रोहितचे हे विश्वचषकातील चौथे शतक ठरले. पण आता विश्वचषकात इतिहास रचण्यासाठी रोहित फक्त एक पाऊल दूर आहे.

एका विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकांचा विक्रम श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या नावावर आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषकात संगकाराने चार शतके झळकावली होती. रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे. आता पुढील सामन्यात जर रोहितने शतक झळकावले तर तो इतिहास रचू शकतो.

रोहित शर्माच्या शतकानंतर भारताची बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पण भक्कम पायाच्या जोरावर भारताला बांगलादेशपुढे 315 धावांचे आव्हान ठेवता आले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अचूक असल्याचे रोहितने दाखवून दिले. रोहितला यावेळी लोकेश राहुलचीही चांगली साथ मिळाली. रोहित आणि लोकेश या दोघांनी मिळून 29.2 षटकांत 180 धावांची सलामी दिली. रोहितने यावेळी विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. पण गेल्या सामन्यासारखेच रोहितला शतकानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 104 धावांची खेळी साकारली.

रोहित बाद झाल्यावर काही वेळात राहुलही बाद झाला. राहुलने सहा चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर 77 धावा केल्या. या दोघांनंतर एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. रिषभ पंतने 48 धावांची खेळी साकारली, पण यावेळीही तो बेजबाबदारपणे बाद झाला.

विश्वचषकात रोहित 'टॉप'वर; चौथ्या शतकसह गाठले शिखरबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्मा विश्वचषकात 'टॉप'वर पोहोचला आहे. या खेळीनंतर रोहित विश्वचषकातील शिखरावर पोहोचला आहे. या सामन्यात रोहितने काही विक्रम रचत असताना ही दमदार कामगिरीही केली आहे.

यंदाच्या विश्वचषकातील रोहितचे हे चौथे शतक ठरले. त्याचबरोबर रोहितने एक अर्धशतकही झळकावले आहे. या सामन्यातील शतकासह रोहितने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर या विश्वचषकात सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले आहे.

हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास, धोनीलाही टाकले मागेबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. यंदाच्या विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. हे शतक पूर्ण करण्यापूर्वी रोहितने एक इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना रोहितने  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे.

या सामन्यात शतकी खेळी साकारताना रोहितने तब्बल पाच षटकार लगावले. या पाच षटकारांसह रोहितने धोनीला पिछाडीवर टाकले आहे. हे पाच षटकार लगावत रोहित हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 238 षटकार लगावले होते. रोहितने हा विक्रम आता मोडीत काढला आहे.

हा  वर्ल्ड कप रोहितसाठी खूपच खास आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी केल्या होत्या आणि भारताकडून सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. रोहितने चौथी धाव घेताच 2019 मध्ये वन डे क्रिकेटध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या वर्षात त्याने 55 + च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. ॲरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांच्या नंतर चालू वर्षात 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने चौथी धाव घेताच नावावर विक्रम केला. 2019 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला तिसरा फलंदाज ठरला.

धोनीच्या आधी टीम इंडियात आला, पण आज पहिला वर्ल्ड कप सामना खेळणारभारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतील प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळतील हे अपेक्षित होते. त्यानुसार आज भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली. कुलदीप यादव आणि केदार जाधव यांना विश्रांती देण्याचा सल्ला घेण्यात आला. 

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कार्तिकचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न साकार झाले. 2004 साली म्हणजे त्याने भारताच्या संघातून पदार्पण केले. म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्याही आधी. त्यानंतर 2007 , 2011 आणि 2015 असे तीन वर्ल्ड कप झाले. पण कार्तिकला संधी मिळालीच नाही.

टॅग्स :रोहित शर्मावर्ल्ड कप 2019भारतबांगलादेश