Join us  

Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहली बाद झाला, पण दिग्गज कर्णधारांना धक्का देऊन गेला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 4:22 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटचा हा झंझावात 136 धावांवर थांबवण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना यश आलं. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. ही खेळी डे नाइट कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली.

इशांत शर्मा ( 5/22), उमेश यादव ( 3/29) आणि मोहम्मद शमी ( 2/36) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत गुंडाळला. बांगलादेशकडून शदमन इस्लाम ( 29) आणि लिटन दास ( 24) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, पुजारा व विराटनं संघाचा डाव सावरला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळवून दिली. पुजाराला इबादत होसैननं माघारी पाठवलं. अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. त्यानंतर विराटनं शतक पूर्ण केलं. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारतानं दोनशे धावांची आघाडी घेतली.

डे नाइट कसोटीत शतक झळकावणारा तो पाचवा कर्णधार ठरला. दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस ( 2016), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( 2016), इंग्लंडचा जो रूट ( 2017) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( 2018) यांनी शतक झळकावले आहेत. पण, डे नाइट कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या कर्णधारांत कोहलीनं इंग्लंडच्या जो रुटच्या विक्रमाशी बरोबरी केली. रुटनं 2017मध्ये 136 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 130 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीबीसीसीआय