Join us  

Ind vs Ban, Day Night Test: विराटच्या मनात चाललंय काय? रोहितकडून करून घेतला गोलंदाजीचा सराव

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:36 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं 161 चेंडूंत 102 धावा करताना दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं 188 डावांत 41 शतकं झळकावली, तर पाँटिंगला हा पल्ला गाठण्यासाठी 376 डाव खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 368 डावांत 33 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित शर्मानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रोहितनं फलंदाजीचा सराव सोडून चक्का मध्यमगती गोलंदाजी केली. इशांत शर्मा ( 5/22), उमेश यादव ( 3/29) आणि मोहम्मद शमी ( 2/36) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत गुंडाळला. बांगलादेशकडून शदमन इस्लाम ( 29) आणि लिटन दास ( 24) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, पुजारा व विराटनं संघाचा डाव सावरला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळवून दिली. पुजाराला इबादत होसैननं माघारी पाठवलं. अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. त्यानंतर विराटनं शतक पूर्ण केलं. पण, या सामन्याचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी रोहितनं गोलंदाजीचा सराव केला. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माविराट कोहलीअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा