Join us  

India vs Bangladesh : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच बांगलादेशला धक्का, सलामीवीराची माघार

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:47 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे आणि भारताच्या जलदगती गोलंदाजीची जबाबदारी खलिल अहमद, दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंवर असणार आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या चमूत अनुभवी खेळाडूंची फौज आहे. तरीही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी बांगलादेशला धक्का बसला आहे. 

वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मागण्या मान्य केल्यानंतर खेळाडूंनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आता आगामी भारत दौऱ्यावरील संकट टळले आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20 व दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेतून बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बालने माघार घेतली आहे. इक्बालच्या घरी गोड बातमी येणार असल्यामुळे त्यानं पत्नीला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. इक्बालच्या जागी बांगलादेश क्रिकेट मंडळाने इम्रुल कायेसला ट्वेंटी-20 संघात स्थान दिले आहे. 

''कोलकाता येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे तमीम इक्बालने आधीच सांगितले होते. पण, आता ट्वेंटी-20 मालिकेतही खेळणार नाही. त्याची पत्नी गर्भवती असून त्याला तिच्यासोबत राहणे गरजेचे आहे,'' अशी माहिती निवड समिती प्रमुख मिहांजूल अबेदीन यांनी दिली. इक्बालच्या आधी मोहम्मद सैफुद्दीनने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे, परंतु त्याला बदली खेळाडू अजून जाहीर करण्यात आलेला नाही. 

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), इम्रुल कायेस, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेश