Join us  

India vs Bangladesh, 3rd T20I : निर्णायक सामन्यात टीम इंडिया करणार का बदल? जाणून घेऊया अंतिम अकरा!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 9:34 AM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. भारतीय संघाला अजूनही काही आघाडींवर योग्य पर्याय सापडलेला नाही आणि अंतिम सामन्यात ही कमकुवत बाब टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा काही महत्त्वाचे बदल करते की आहे त्याच संघाने मैदानात उतरते हे पाहणे ओत्सुक्याचे ठरेल.

India vs Bangladesh : रोहित शर्माच्या षटकारावरून मुंबई इंडियन्सनं पसरवली 'ही' अफवा!

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्माला जे जमतं, ते विराट कोहलीला जमणार नाही; वीरूचा दावा

पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. यजमानांना 148 धावाच करता आल्या. शिखर धवन, रिषभ पंत वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. सौम्या सरकार -  मुशफिकर रहीम यांनी भारताच्या चमूत तणाव निर्माण केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या हातून सामना खेचून आणला. रहीमनं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतावर पहिला विजय मिळवून दिला. 

दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या वादळी खेळीनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 85) आणि शिखर धवन (31) यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. त्यामुळे आता नागपूर येथे होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मजबूत व कमकुवत बाजूरोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल ही तगडी आघाडीची फळी भारताकडे आहे. रोहित आणि धवन यांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर यानं साजेशी कामगिरी केली आहे. रिषभ पंत याचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने यष्टिमागेही निराश केले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला बसवले जावे, अशी मागणी होत आहे. पंतला पर्याय म्हणून संघात संजू सॅमसन हा पर्याय आहे. शिवाय मनीष पांडेला संधी देऊन राहुलला यष्टिमागे जबाबदारी सांभाळण्यास देता येईल. 

वीरू, विराटशी बरोबरी; रोहित शर्माचे विक्रम लै भारी!

गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळालीय, परंतु त्यांना त्यावर खरे उतरता आलेले नाही. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. पण, जलद माऱ्यात टीम इंडियाला मार खावा लागला आहे. दीपक चहरच सातत्यपूर्ण खेळ करताना पाहायला मिळत आहे. त्याला खलिल अहमदकडून साजेशी साथ मिळालेली नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेकडे तितकासा अनुभव नाही. त्यामुळे खलिल आणि शिवम यांच्या जागी अनुक्रमे शार्दूल ठाकूर व मनीष पांडे यांना संधी मिळू शकते. पण, रोहित आहे तोच संघ तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. 

असा असेल संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, खलिल अहमद, दीपक चहर, युजवेंद्र चहल

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माशिखर धवनलोकेश राहुलयुजवेंद्र चहलरिषभ पंत