IND vs AUS 2nd Semi-Final : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या सेमीफायनलची लढत रंगली आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जर टॉस जिंकला असता तर फलंदाजी करण्यालाच पसंती दिली असती, असे हरमनप्रीत कौर म्हणाली. यावरुन टॉसच्या रुपात ऑस्ट्रेलियानं पहिला डाव जिंकला आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय संघ या सामन्यात प्रतीका रावलच्या जागी शफाली वर्मासह मैदानात उतरला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदा फायनल गाठली आहे. आता ऑस्ट्रेलियाला आउट करून टीम इंडिया पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.
IND vs AUS 2nd Semi Final : 'वनडे क्वीन'चा 'लेडी सेहवाग'सोबतचा रेकॉर्ड दमदार, पण...
महिला वर्ल्ड कप स्पर्धेत एका हंगामात सर्वाधिक नाणेफेक गमावणारे संघ
- ९ पैकी १३ वेळा नाणेफेक गमावली -इंग्लंड महिला संघ (१९८२)
- ८ पैकी १२ वेळा नाणेफेक गमावली -भारत महिला संघ (१९८२)
- ७ पैकी ७ वेळा नाणेफेक गमावली -श्रीलंका महिला संघ (२०००)
- ८ पैकी ७ वेळा नाणेफेक गमावली - दक्षिण आफ्रिका महिला संघ (२०२५)
- ८ पैकी ७ वेळा नाणेफेक गमावली – भारत महिला संघ (२०२५)
भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन
शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
ऑस्ट्रेलिया महिला प्लेइंग इलेव्हन
फोबी लिचफील्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट