मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ मालिकेत कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू गुरूवारी मेलबर्नला दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती. मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर असूनही भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जाणवत होता. संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा तर 'कॅमेरामॅन'च्या भूमिकेत दिसला. संघातील एका खेळाडूला जाहिरातीचे चित्रिकरण कसे करायचे याच्या टिप्स तो देत होता.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात विजयासमीप जाऊन माघारी फिरावे लागले. अवघ्या चार धावांनी भारताला हार मानावी लागली आणि ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात रोहितला मोठी खेळी साकारता आली नव्हती. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर कसून सराव करताना दिसेल असे वाटले होते, परंतु तो चक्क सहकारी फलंदाजाला जाहिरातीसाठीच्या पोझिंग टिप्स देत होता. त्यामुळे काही चाहते त्याच्यावर रागावले, पण काहींनी रोहित पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पळता भुई करेल अशी आशा व्यक्त केली.
![]()
पाहा व्हिडीओ....