Join us  

India vs Australia : श्रेयस अय्यरचा 'बुलेट' थ्रो; डेव्हिड वॉर्नर शतकापासून राहिला वंचित, Video

टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 29, 2020 11:18 AM

Open in App
ठळक मुद्देडेव्हिड वॉर्नर-अॅरोन फिंच यांची १४२ धावांची सलामीमोहम्मद शमीनं मिळवून दिलं पहिलं यश, त्यानंतर श्रेयस अय्यरनं मिळवली महत्त्वाची विकेट

India vs Australia, 2nd ODI :   अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. १४२ धावांचा भक्कम पाया रचल्यानंतर दोन्ही सलामीवीर मागोमाग तंबूत परतले.  श्रेयस अय्यरच्या बुलेट थ्रोनं वॉर्नरला माघारी जाण्यास भाग पाडले. 

पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संघात बदल करेल असे अपेक्षित होते, परंतु विराटनं तोच संघ कायम राखला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटका बसला आणि मार्कस स्टॉयनिसला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात मोइजेस हेनरिक्सला संधी मिळाली. विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम

वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नवदीप सैनीला टार्गेट करताना वॉर्नरने काही सुरेख फटके मारले. जसप्रीत बुमराहचे अपयश ही खरी टीम इंडियाची डोकेदुखी आहे. वॉर्नरला धावबाद करण्याची संधी भारतीयांनी गमावली आणि त्यानंतर त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. वॉर्नर-फिंचनं सलग दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीनं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. फिंच ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा करून माघारी परतला. फिंच व वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांचा भक्कम पाया रचला. त्यानंतर वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. लाँग ऑफवर असलेल्या श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) डायरेक्ट हिट करून वॉर्नरला बाद केले.  ९७८ वन डे सामन्यानंतर टीम इंडियावर प्रथम ओढावली नामुष्की; विराटच्या नावे नकोसा विक्रम

पाहा व्हिडीओ.. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंच