Join us

IND vs AUS : विराट कोहलीच्या 'डान्स स्टेप्स'नं शास्त्री गुरुजी थक्क, पाहा व्हिडीओ

India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशनही दणक्यात होणे साहजिकच होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 09:24 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचलाऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिलाच आशियाई कर्णधार

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशनही दणक्यात होणे साहजिकच होते. मालिका 2-1 अशी खिशात घातल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर, हॉटेल लॉबीत केलेल्या डान्सने सर्वांची वाहवाह मिळाली. मात्र, एक व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात कर्णधार विराट कोहली मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षक 'डान्स स्टेप्स' दाखवत आहे. त्याच्या या स्टेप्सपाहून शास्त्री गुरुजींसह सर्वच थक्क झाले. 

सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने सामना अनिर्णीत राहिला आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक विजय दणक्यात साजरा केला. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदानावर जमलेल्या भारतीय संघाने स्टेडियमला प्रदक्षिणा घातली आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर खेळाडूंनी मैदानावर डान्स केला.हॉटेलमध्ये परतल्यानंतरही भारतीय खेळाडूंचा हा जल्लोष कायम होता. भारत आर्मीच्या चाहत्यांसोबत खेळाडूंनी बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला. पण, नव्याने समोर आलेल्या व्हिडीओत कोहली शास्त्रींसह अन्य सहकाऱ्यांना डान्स स्टेप्स शिकवत असल्याचे दिसत आहे. एरवी शांत दिसणारे साहाय्यक प्रशिक्षकही कोहलीने शिकवलेल्या स्टेप्सवर थिरकले.  पाहा हा व्हिडीओ...  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरवी शास्त्रीबीसीसीआय