Join us

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत लक्ष्मणनं केलं भाकित, म्हणाला... 

India vs Australia : आठवड्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेसंदर्भात क्रिकेट वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 09:50 IST

Open in App
ठळक मुद्देभारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधीभारतीय खेळाडूंमध्ये इतिहास घडवण्याची क्षमताचार सामन्यांची ही मालिका भारत 3-1 अशी जिंकेल

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आठवड्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेसंदर्भात क्रिकेट वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत. कोण बाजी मारणार, कोणाची बाजू वरचढ असणार, अशा अनेक गोष्टींवर पैजा लावल्या जात आहेत. मात्र, भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने या मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे तो म्हणाला.

IND vsAUS : भारतालाधोका, स्टीव्हनस्मिथदेतोयऑस्ट्रेलियाच्याकोचला'सिक्रेट टिप्स'! https://t.co/TKMmvF5Bk0@BCCI@CricketAust#AUSvIND

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) November 27, 2018  

 दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ या मालिकेत फेव्हरिट मानला जात आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय अव्वल स्थानावर आहे, म्हणून त्यांचे पारडे जड नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची अनुपस्थिती भारतासाठी पोषक आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ इतिहास घडवेल असा, अनेकांना विश्वास आहे. 

भारताने ऑस्ट्रेलियात 11 कसोटी मालिका खेळल्या, परंतु त्यात एकदाही बाजी मारता आली नाही. 2014मध्ये भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर भारतीय संघ 2018 मध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. ''या मालिकेत भारतीय संघ 3-1 अशी बाजी मारेल, असा मला विश्वास आहे. भारताला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. स्मिथ व वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नाही, म्हणून मला असं वाटत नाही, तर भारतीय संघात ती क्षमता आहे. इंग्लंड मालिकेत मी भारताच्या बाजूने 4-1 असे भाकित केले होते, ते पूर्णतः चुकीचे ठरले, परंतु ऑस्ट्रेलियात भारत बाजी मारेल,''असे लक्ष्मण म्हणाला. 

 2018 मध्ये भारताने नऊ कसोटी सामने खेळले आणि त्यातील पाच जिंकले. त्याउलट ऑस्ट्रेलियाला सात कसोटींत केवळ दोनच विजय मिळवता आले आहेत. लक्ष्मण पुढे म्हणाला,'' मी ऑस्ट्रेलियात 1999 सालापासून खेळत आले. घरच्या मैदानावरही ( 1996) मी त्यांच्याविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळलो. त्यांच्याकडे दिग्गज खेळाडू होते. ते केवळ घरच्या मैदानावरच नाही, तर परदेशातही सामने जिंकण्याची धमक राखत होते. ती जिद्द आत्ताच्या संघातील खेळाडूत दिसत नाही." 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय