Join us

IND vs AUS : विकेट मिळताच विराट कोहलीनं केलं अनोखं सेलिब्रेशन; त्यालाही हसू आवरलं नाही 

India vs Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 16:01 IST

Open in App
ठळक मुद्देभारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना अनिर्णीतमुरली विजयची अखेरच्या दिवशी शतकी खेळीभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी 6 डिसेंबरपासून

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताच्या पहिल्या डावाच्या 358 धावांच्या उत्तरात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 544 धावा कुटल्या. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला. कर्णधार विराट कोहलीने मात्र बॅट आणि बॉल या आघाड्यांवर हात साफ केला. कोहलीने सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी केली. त्यालाही फार कमाल करता आली नाही. मात्र चौथ्या दिवशी त्याने संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. कोहलीने शतकी खेळी करणाऱ्या हॅरी नाएलसनची विकेट घेतली. डावखुऱ्या नाएलसनने कोहलीच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला, परंतु उमेश यादवने सोपा झेल घेत नाएलसनची घोडदौड थांबवली. यादवने झेल टिपताच कोहलीला हसू आवरले नाही आणि त्याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये जॉन्सन चार्लेसची घेतलेली एकमेव विकेट कोहलीच्या नावावर आहे. नाएलसनची विकेट ही प्रथम श्रेणीक्रिकेटमध्ये मोजली जाणार नाही.

पाहा व्हिडिओ... ( https://www.cricket.com.au/video/virat-kohli-wicket-hilarious-reaction-harry-nielsen-century-india-ca-xi-highlights-scg/2018-12-01

दरम्यान भारतीय गोलंदाजांनी क्रिकेटऑस्ट्रेलियाचा डाव 544 धावांवर रोखण्यात यश मिळवले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 186 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला. लोकेश राहुलने 62 आणि मुरली विजयने 129 धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली