Join us

India vs Australia : भारताच्या फलंदाजांना विराट कोहलीने दिली समज

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करावी, असे कोहलीने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:21 IST

Open in App
ठळक मुद्देसंघाची गोलंदाजी भेदक आहे.संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.हा दौरा भारतीय खेळाडू गाजवतील, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला आहे.

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील फलंदाजांना समज दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करावी, असे कोहलीने सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहली म्हणाला की, " आमची गोलंदाजी भेदक आहे. परदेशात आम्ही प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांमध्ये शकतो. पण फलंदाजांनी मात्र जबाबदारीने खेळ करायला हवा. संघातील प्रत्येक जण सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघात योग्य समन्वय पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा दौरा गाजवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. " 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली