अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता. चार दिवसीय सराव सामना अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघ अॅडलेड येथे दाखल झाला आहे. अॅडलेड येथे दाखल होताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. इशांत शर्मा आणि रिषभ पंत यांनीही काही फोटो शेअर केले आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS : भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी अॅडलेडमध्ये दाखल, पाहा फोटो
IND vs AUS : भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी अॅडलेडमध्ये दाखल, पाहा फोटो
India vs Australia: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 16:37 IST