सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. कोहलीने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 64 धावांचा खेळ केला. कोहलीने ही खेळी करून आगामी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशारा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोहलीची बॅट तळपेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंग याने कसोटी मालिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू नसेल, असे भाकित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या मालिकेत धावांचा रतीब घालेल, अशी भविष्यवाणी पाँटिंगने केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS : विराटपेक्षा 'हा' फलंदाज कसोटीत धावांचा रतीब घालेल, रिकी पाँटिंगचा विश्वास
IND vs AUS : विराटपेक्षा 'हा' फलंदाज कसोटीत धावांचा रतीब घालेल, रिकी पाँटिंगचा विश्वास
India vs Australia: कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 17:28 IST
IND vs AUS : विराटपेक्षा 'हा' फलंदाज कसोटीत धावांचा रतीब घालेल, रिकी पाँटिंगचा विश्वास
ठळक मुद्देविराट कोहलीने सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केलीऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणतो कोहलीची बॅट तळपणार नाहीभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 डिसेंबरपासून