Join us

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा; मुलीच्या जन्मानं झाला भलताच खूश!

चार वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर त्यानं २९ मे २०१३ ला प्रेयसी तान्या वाधवा हिच्याशी लग्न केलं.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 1, 2021 14:03 IST

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) याच्या घरी पाळणा हलला आहे. मुलगी झाल्याची गोड बातमी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यानं मालिकेतूच माघार घेतली. दुखापतीनं ग्रस्त असलेल्या उमेशला या गोड बातमीनं सुखद धक्का दिला आहे. 

उमेशची क्रिकेट कारकिर्द चढउतारांची राहिली आहे. चार वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर त्यानं २९ मे २०१३ ला प्रेयसी तान्या वाधवा हिच्याशी लग्न केलं. तान्या आणि उमेशची भेट एका इव्हेंटमध्ये झाली. तेव्हा तान्या महाविद्यालयात होती आणि उमेश टीम इंडियात स्थान पटकावण्यासाठी मेहनत घेत होता. पण, अपयश येत असल्यानं उमेश निराश होता आणि तान्यानं त्याला प्रोत्साहन दिले. ती त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्यामुळे तो यशस्वी गोलंदाज बनू शकला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ