IND vs AUS Test Series: दुखापतीमुळे भारतीय संघ 'जखमी'; पहिल्या कसोटीत रोहित शर्मा उतरवेल Aus विरुद्ध ही Playing XI

India vs Australia Test series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:14 AM2023-02-03T11:14:24+5:302023-02-03T11:14:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia Test series: The Test series between India and Australia is starting from February 9. | IND vs AUS Test Series: दुखापतीमुळे भारतीय संघ 'जखमी'; पहिल्या कसोटीत रोहित शर्मा उतरवेल Aus विरुद्ध ही Playing XI

IND vs AUS Test Series: दुखापतीमुळे भारतीय संघ 'जखमी'; पहिल्या कसोटीत रोहित शर्मा उतरवेल Aus विरुद्ध ही Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia Test series: भारतीय संघाची खरी कसोटी आगामी टेस्ट सीरिजमध्ये लागणार आहे. २०२३ मध्ये भारतीय संघाने युवा ब्रिगेडला सोडत घेताना वन डे, ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. पण, आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक द्वंद्व छेडले गेले आहे आणि भारतीय संघ मैदानावरील कामगिरीतू त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळेच ही मालिका संपूर्ण मनोरंजनाने भरलेली असेल यात शंकाच नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या कसोटी सामन्याला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा स्थितीत टीम इंडियाच्या नजरा थेट नागपुरात होणाऱ्या महान सामन्यावर खिळल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार, असाही प्रश्न उपस्थित होत असताना कर्णधार रोहित शर्मासमोर प्लेइंग-११ निवडणे हेही आव्हान आहे. कारण संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत आणि प्लेइंग-११ मध्ये निवडीसाठी उपलब्ध नाहीत.

भारतीय कसोटी संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू सध्या संघासोबत नाहीत. कार अपघातामुळे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर आहे, गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो टीम इंडियासाठी हिरो ठरला होता पण तो या मालिकेचा भाग नाही. तसेच मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त नसल्याने तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच क्रिकेटपासून दूर आहे आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताने जाहीर केलेल्या संघात त्याचे नाव नाही.

भारतीय कसोटी संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू सध्या संघासोबत नाहीत. कार अपघातामुळे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर आहे, गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो टीम इंडियासाठी हिरो ठरला होता पण तो या मालिकेचा भाग नाही. तसेच मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त नसल्याने तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच क्रिकेटपासून दूर आहे आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताने जाहीर केलेल्या संघात त्याचे नाव नाही.

दरम्यान, भारतीय संघाने २०२३ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका यशस्वीपणे जिंकल्या. आता ९ फेब्रुवारीपासून भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २०२०-२१च्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कांगारू दाखल झाले आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमधील त्यांचे स्थान निश्चित केलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे.

पहिल्या कसोटीत भारताची अशी असू शकते प्लेइंग ११-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/शुबमन गिल, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव/अक्षर पटेल

संपूर्ण वेळापत्रक (  Full Schedule)

पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला 
चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद

भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India vs Australia Test series: The Test series between India and Australia is starting from February 9.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.