Join us  

India vs Australia : टीम इंडिया शॉर्ट फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देणार?; जाणून घ्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाला संघाला डेव्हिड वॉर्नरची उणीव जाणवणार आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात वॉर्नरला दुखापत झाली आणि त्यानं ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 03, 2020 9:14 AM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकलीभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवातउभय संघांमधील मागील ट्वेंटी-20 मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. भारताला पहिल्या दोन वन डे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आहे आणि त्याच सकारात्मकतेनं ते ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहेत. वन डे मालिकेत धावांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. तीनही सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं तीनशे धावांचा पल्ला ओलांडला. आता हाच धावांचा पाऊस ट्वेंटी-20तही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.  

दोन्ही संघांमध्ये बदलटीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर हे ट्वेंटी-20 संघात आहेत आणि चहरचे अंतिम ११मध्ये खेळणे निश्चित आहे, तर सुंदरला एखाद्या सामन्यात संधी मिळू शकते. फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल पाहायला मिळेल. लोकेश राहुल आणि शिखर धवन ही जोडी सलामीला दिसेल, तर मयांकला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.  

ऑस्ट्रेलियाला संघाला डेव्हिड वॉर्नरची उणीव जाणवणार आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात वॉर्नरला दुखापत झाली आणि त्यानं ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली. पॅट कमिन्सलाही विश्रांती देण्यात आली आहे. वॉर्नरच्या जागी अष्टपैलू डी'आर्सी शॉर्टला संधी दिली आहे. अँड्य्रू टाय अंतिम ११मध्ये खेळताना दिसेल. डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार!

भारताचा ट्वेंटी-20 संघ - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-20 संघ -  अॅरोन फिंच ( कर्णधार), सीन अबॉट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, मोईसेस हेन्रीक्स. मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा, डी'आर्सी शॉर्ट, अँड्य्रू टाय. 

सामने कुठे पाहाल ?सोनी टेन १, सोनी सिक्स आणि सोनी टेन ३. जिओ टिव्ही आणि एअरटेल टिव्ही अॅप 

ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक ४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून           

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरलोकेश राहुलशिखर धवन