Join us  

IND vs AUS : स्मिथ-वॉर्नर देणार ऑसी गोलंदाजांना 'विराट'सेनेला रोखण्याचा 'मंत्र'

India vs Australia : विराट कोहलीने ट्वेंटी-20 मालिकेत भारताला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु त्यांचा खरा कस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 9:15 AM

Open in App
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून स्मिथ व वॉर्नर करणार ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शनविराट कोहलीच्या संघाचा कसोटी मालिकेत कस लागणार

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीने ट्वेंटी-20 मालिकेत भारताला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु त्यांचा खरा कस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार आहे. चार सामन्यांच्या या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ एक सराव सामना खेळेल, कसोटी संघातील काही सदस्य न्यूझीलंडमध्ये भारत अ संघाकडून सराव सामन्यात खेळपट्टीवर स्थिरावण्याचे तंत्र शिकले आहेत. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने कंबर कसली असली तरी यजमान ऑस्ट्रेलियाही पूर्णपणे तयार आहे. भारतीय संघाला रोखायचं कसं यासाठी त्यांना स्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर यांच्याकडून मंत्र दिला जात आहे. 

 

बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे स्मिथ व वॉर्नर यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली. त्यांना कसोटी मालिकेत खेळता यावे यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बरेच प्रयत्न झाले, परंतु त्यांच्यावरील बंदी उठवली नाही. त्यामुळे त्यांना कसोटी संघाचा भाग होता येणार नाही. मात्र, स्मिथ व वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना भारतीय खेळाडूंना कसे रोखायचे, याच्या टिप्स देणार आहेत. स्मिथ व वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रात सहभागी होणार आहेत आणि तेथे ते मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड व पॅट कमिन्स यांना विराट सेनेला रोखण्याचा मंत्र देणार आहेत. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याने चेंडू कुरतडला. त्याची ही लबाडी कॅमेरात पकडली गेली आणि त्यानंतर कर्णधार स्मिथ व उपकर्णधार वॉर्नर यांच्या सांगण्यावरून हे घडल्याचे समोर आले. म्हणून स्मिथ व वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षांची, तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. बॅनक्रॉफ्टवरील बंदीचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर