सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्यामुळे त्याने भारताविरुद्धच्या अंतिम दोन टी-२० लढतीतून माघार घेतली आहे.
३० वर्षीय हा गोलंदाज पाठ व बरगड्यांच्या दुखापतीमुळे तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळू शकला नव्हता, पण शुक्रवारी कॅनबरामध्ये पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २ बळी घेतले होते.स्टार्क शनिवारी सिडनीमध्ये पोहोचला, पण कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचे कळताच तो संघाचे बायोबबल सोडून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले,‘जगातील कुठलीही बाब कुटुंबापेक्षा महत्त्वाची नाही .’