ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

India vs Australia 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे.

By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 04:08 PM2020-11-25T16:08:07+5:302020-11-25T16:08:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Rishabh Pant's or Riddhiman Saha? Who will get a chance against Australia; Ganguly Says... | ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात ऋषभ पंत आणि ऋद्धिमान साहा हे प्रमुख यष्टिरक्षक आहेतऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जो चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे, असे सौरव गांगुलीने सांगितलेसौरव गांगुलीच्या विधानाचा विचार केल्यास भारतीय संघ पहिल्या वनडेसाठी ऋद्धिमान साहाला संघात स्थान देऊ शकतो

नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला आता केवळ एक दिवस उरला आहे. शुक्रवारी खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, या सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात ऋषभ पंत आणि ऋद्धिमान साहा हे प्रमुख यष्टिरक्षक आहेत. आता यापैकी कुणाला संधी द्यावी, याबाबत भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने आपले मत प्रदर्शित केले आहे.

पीटीआयशी संवाद साधताना गांगुलीने सांगितले की, सध्या भारतीय संघाकडे ऋषभ पंत आणि ऋद्धिमान साहा यांच्या रुपात दोन दर्जेदार यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जो चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे, असे सौरव गांगुलीने सांगितले.

सौरव गांगुलीच्या विधानाचा विचार केल्यास भारतीय संघ पहिल्या वनडेसाठी ऋद्धिमान साहाला संघात स्थान देऊ शकतो. साहाने नुकत्याच आटोपलेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. तर पंतला अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नव्हती. त्याने १४ सामन्यात ३१.१८ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या होत्या. तसेच पंतचा स्ट्राइकरेटसुद्धा ११३.९५ एवढाच राहिला होता. उलट ऋद्धिमान साहाने केवळ ४ सामने खेळताना ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा कुटल्या होत्या. तर त्याचा स्ट्राईकरेटसुद्धा १४० च्या वर होता. एवढेच नाही तर यष्टिरक्षणामध्येदेखील साहाची कामगिरी ही ऋषभ पंतपेक्षा उजवी झाली होती.

दुसरीकडे ऋषभ पंतचा ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या पंतने चार सामन्यांत ५८.३३ च्या सरासरीने ३५० धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश होता. आता संघव्यवस्थापन पंतचा रेकॉर्ड पाहते की साहाच्या फॉर्मचा विचार करते हे पाहावे लागेल.

Web Title: India vs Australia : Rishabh Pant's or Riddhiman Saha? Who will get a chance against Australia; Ganguly Says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.