ठळक मुद्देभारताच्या पाच फलंदाजांचे अर्धशतकसराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावाबीसीसीआयने खेळला Rapid Fire Round
मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यात चांगला खेळ केला. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 358 धावा केल्या आणि त्यात पाच फलंदाजांनी अर्धशतकं केली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसह Rapid Fire राऊंड खेळला. त्यात विचारलेल्या प्रश्नांवर खेळाडूंनी दिलेली भन्नाट उत्तर ऐकून हसू आवरणार नाही. या Rapid Fire राऊंडमधूनच संघातील सर्वात विसरभोळा खेळाडू कोण यावर मिळालेले उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल.
पावसामुळे सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यामुळे सकाळी जिममधील व्यायामानंतर बीसीसीआयने ड्रेसिंग रूममध्ये काही निवडक खेळाडूंना प्रश्न विचारले आणि त्यावर खेळाडूंना भन्नाट उत्तरे दिली.
सर्वाधिक झोपाळू कोण? ठरलेले प्लॅन रद्द करणारा कोण? कायम भुकेलेला कोण असतो? सर्वात विसराळू कोण? सगळ्यात जास्त फोनवर व्यग्र कोण असतो? असे प्रश्न Rapid Fire मध्ये खेळाडूंना विचारण्यात आले.
पाहा संपूर्ण व्हिडीओ...
( http://www.bcci.tv/videos/id/7124/the-1-minute-wrap-with-team-india)
दरम्यान, सराव सामन्याचा दुसरा दिवस भारताच्या पृथ्वी शॉ, हनूमा विहारी, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीने चर्चेत राहिला. भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दुसऱ्या दिवशी 92 षटकांत 358 धावा केल्या. पृथ्वीने आपल्या आक्रमक फलंदाजीने पुन्हा एकदा प्रभावित केले. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या. दिवसअखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 24 धावा झाल्या आहेत.