Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs Australia : धोनीने पुन्हा एकदा सामना संपल्यावर चेंडू घेतला आणि म्हणाला...

सामना संपल्यावर धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला. त्यानंतर धोनी आता निवृत्ती घेणार, अशी बातमी पसरली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 14:24 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीमधला मिडास टच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जिंकला. धोनीने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले आणि दोनदा विजयाचा शिल्पकार ठरला. पण सामना संपल्यावर धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला. त्यानंतर धोनी आता निवृत्ती घेणार, अशी बातमी पसरली होती.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने नाबाद 87 धावांची खेळी साकारली. धोनीच्या या खेळीच्या जोरावर भारताचा विजय सुकर झाला. धोनीमधला फिनिशर पुन्हा एकदा भारताला या मालिकेत गवसला. हा सामना जिंकल्यावर धोनीशी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हस्तांदोन करत होते. त्यावेळी पंचही धोनीजवळ आल्यावर धोनीने चेंडूची मागणी केली आणि पंचांनीही धोनीला चेंडू दिला. त्यानंतर धोनी जेव्हा भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता, तेव्हा धोनीच्या हातात चेंडू असल्याचे साऱ्यांनीच पाहिले. त्यानंतर धोनीने हा चेंडू प्रशिक्षक संजय बांगर यांना दिला आणि त्यांना म्हणाला, " हा चेंडू तुमच्याजवळ ठेवा. नाहीतर पुन्हा माझ्या निवृत्तीची चर्चा सुरु होईल. " 

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया