Join us

India vs Australia : धोनी हा मनकवडा, फलंदाजाच्या मनातलंही ओळखतो 

सांगतोय भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 17:49 IST

Open in App

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : काही कलाकृतींमध्ये एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या मनातलं ओळखल्याचे आपण साऱ्यांनीच पाहिले असेल. पण असे खऱ्या आयुष्यात मात्र पाहायला मिळालेले नाही. पण धोनी हा आपल्या संघातल्या नाही तर प्रतिस्पर्धी संघातील फलंदजाच्या मनातलं ओळकतो. हे सांगतोय भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव.

महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यात कधी काय चालेल, हे सांगता येत नाही. तो एक अवलिया आहे. तो स्वत: नेमकं काय करतो, हे कोणालाही कळत नाही. दुसरीकडे समोरचा खेळाडू काय करणार आहे, हे तो उत्तमपणे जाणतो. या गोष्टीचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही आला होता.

धोनीबाबत कुलदीप म्हणाला की, " धोनी हा नेहमीच गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. धोनीच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होतो. आम्ही फार सुदैवी आहोत, जेणेकरून आम्हाला धोनीसारख्या महान क्रिकेटपटूबरोबर खेळण्याचा योग आला आहे. धोनीने मोठ्या स्तरावर बराच काळ क्रिकेट खेळले आहे. त्याच्या गाठिशी भरपूर अनुभव आहे. हा अनुभव धोनी नेहमीच आमच्याशी शेअर करत असतो. बऱ्याचदा धोनी हा फलंदाजांच्या मनातील गोष्टीही ओळखतो आणि या गोष्टीचा प्रत्यय आम्हालाही आला आहे."

धोनीचं डोकं चालतं लय भारी, केदार-विराटही झाले चकित!

भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने अॅडम झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात धोनीने अशी एक गोष्ट केली, सर्व चकित झाले. ही गोष्ट घडली ती 33व्या षटकात. केदार जाधव हा 33वे षटक टाकत होता. चेंडू कसा टाकायचा हे सल्ले तो केदारला देत होता. केदारने एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. त्यावेळी फलंदाज नेमका कोणता फटका मारणार, हे धोनीला कळून चुकले होते. धोनी ऑफ स्टम्पच्या बाहेर उभा होता. फलंदाज आता पॅडल स्विप मारणार, हे धोनीला समजले. चपळ धोनी तिथून थेट लेग स्लिपच्या जागेपर्यंत पोहोचला. फलंदाजही पॅडल स्विप खेळला. लेग स्लिपला गेलेल्या धोनीच्या ग्लोव्ह्जला यावेळी चेंडू लागला. जर हा झेल पकडला गेला असता तर तो आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल ठरला असता. धोनीची ही गोष्ट पाहिल्यावर कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवही चकित झाले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकुलदीप यादवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया