रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले. कोहलीने 123 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला झटपट तीन धक्के बसले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रिसिंग धोनी यांनी संघाला स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी 26 धावांवर बाद झाला. धोनी बाद झाल्यावर कोहलीने केदार जाधवबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण केदार बाद झाल्याने हा प्रयत्नही अपयशी ठरला. कोहलीने 16 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 123 धावा केल्या. कोहलीचे हे 41वे शतक ठरले.
09:18 PM
तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का
08:26 PM
कोहली 123 धावांवर आऊट
08:14 PM
विराट कोहलीचे 41वे शतक
07:22 PM
घरच्या मैदानात धोनीकडून निराशा, 26 धावांवर बाद
06:44 PM
कोहलीच्या चौकाराने भारताचे अर्धशतक
06:18 PM
अंबाती रायुडू आऊट
06:07 PM
फटकेबाजी करणारा रोहित शर्माही बाद
05:06 PM
ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 314 धावांचे आव्हान
04:35 PM
पीटर हँड्सकॉम्ब आऊट
04:29 PM
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल बाद
04:14 PM
शतकवीर उस्मान ख्वाजा आऊट
03:52 PM
मॅक्सवेलच्या षटकारासह ऑस्ट्रेलियाचा दोनशे धावा पूर्ण
03:45 PM
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आऊट
03:15 PM
ऑस्ट्रेलियाचे 25व्या षटकात दीडशतक पूर्ण
02:12 PM
दहा षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया बिनबाद 52
02:12 PM
चौकारासह आरोन फिंचचे अर्धशतक पूर्ण
01:53 PM
पहिल्या पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया बिनबाद 20 धावा
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने संयत सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता 20 धावा केल्या होत्या.
01:52 PM
भारताच्या संघात कोणताही बदल नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सा़मन्यासाठी भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
01:11 PM
भारताच्या संघात कोणताही बदल नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सा़मन्यासाठी भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.