सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारापाठोपाठ यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या मोठ्या धडाक्यामुळे भारताने चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात 7 बाद 622 असा डोंगर उभारला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने सावध पवित्रा घेत बिनबाद 24 धावांची वाटचाल केली आहे. दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1अशी आघाडी संपादन केली आहे. ही मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाचा मान आणखी उंचावणार आहे.
LIVE
Get Latest Updates
11:41 AM
पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला
11:10 AM
अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवला, ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा
10:51 AM
ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 232 धावा
10:36 AM
ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 219 धावा
10:28 AM
ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 212 धावा
09:44 AM
ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, ट्रॅविस हेड बाद
08:45 AM
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मार्नस लबुशेन 38 धावा करून बाद
08:40 AM
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का
08:30 AM
ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 152 धावा
08:30 AM
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
08:20 AM
ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 144 धावा
07:19 AM
उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 122 धावा
07:04 AM
50 धावांची भागिदारी
मार्कस हॅरिस आणि लबुशान यांनी 106 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली आहे. मार्कस हॅरिस 77 आणि लबुशान 18 धावांवर खेळत आहेत.
07:04 AM
उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 122 धावा
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या सामन्यात फलंदाज मार्कस हॅरिसच्या शानदार खेळीमुळे 40 षटकांत एक बाद 122 धावा केल्या आहेत. मार्कस हॅरिसने 109 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या आहेत. तर लबुशानने 60 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. दरम्यान, भारताचा गोलंदाज कुलदीपने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला 27 धावांवर झेलबाद केले. ऑस्ट्रेलिया अद्याप 500 धावांनी मागे आहे.
06:45 AM
मार्कस हॅरिसची दमदार खेळी
मार्कस हॅरिस दमदार फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाचा 36 षटकांत एक बाद 144 धावा झाल्या आहेत. मार्कस हॅरिस (100) आणि लबुशान (15 खेळत आहेत.
06:17 AM
28 षटकांत 99 धावा
ऑस्ट्रेलियाच्या 28 षटकांत एक बाद 99 धावा झाल्या आहेत. मार्कस हॅरिस (63) आणि लबुशान (9) खेळत आहेत.
06:08 AM
मार्कस हॅरिसचे अर्धशतक
मार्कस हॅरिसने 68 चेंडूत 50 धावा केल्या आहेत.
05:52 AM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
उस्मान ख्वाजा 27 धावांवर झेलबाद.
05:44 AM
68 धावांची भागिदारी
मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा यांनी 122 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली आहे.
05:34 AM
ऑस्ट्रेलियाच्या 57 धावा
ऑस्ट्रेलियाच्या 17 षटकांत 57 धावा झाल्या आहेत. मार्कस हॅरिस (37) आणि उस्मान ख्वाजा (20) खेळत आहेत.
05:20 AM
14 षटकांत 32 धावा
ऑस्ट्रेलियाच्या 14 षटकांत 32 धावा झाल्या आहेत.
05:05 AM
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने काल बिनबाद 24 धावांची वाटचाल केली आहे. मैदानात मार्कस हॅरिस (19) आणि उस्मान ख्वाजा (5) खेळत आहेत.