Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 1st Test Live: चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया 4 बाद 104

भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 13:15 IST

Open in App

ऍडलेड- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात भारतानं 3 बाद 151 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताला 15 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवसाला भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असून या मैदानावरील पाठलाग करण्याची ही मोठी धावसंख्या आहे. यामुळे सध्यातरी भारताचे पारडे जड आहे. 

Live Updates:

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया 4 बाद 104

 

ऑस्ट्रेलिया चौथा धक्का; पीटर हँड्सकॉम्ब आऊट

ऑस्ट्रेलिया तिसरा धक्का बसला असून उस्मान ख्वाजा 8 धावांवर बाद. ऑस्ट्रेलिया 60/3

 

ऑस्ट्रेलिया दुसरा धक्का बसला असून; एम. हॅरिस बाद 26 वर बाद. ऑस्ट्रेलिया 44/2

 

 

भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान

 

भारताला पाचवा धक्का; रोहित शर्मा एका धावेवर झेलबाद; भारत 250/5

- भारताला चौथा धक्का; पुजारा 71 धावांवर बाद- भारताकडे 200 धावांची आघाडी; पुजारा-रहाणेची दमदार फलंदाजी, 50 धावांची भागिदारी पूर्ण- रहाणेचा खणखणीत चौकार- लायनच्या गोलंदाजीवर रहाणे झेलबाद; मात्र रिव्ह्यूमध्ये रहाणे नाबाद- नॅथन लायनच्या गोलंदाजीवर पुजाराचा खणखणीत चौकार- चेतेश्वर पुजाराचे शानदार अर्धशतक- हेझलवूडच्या षटकात पुजाराचे दोन चौकार- चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात; पुजारा, रहाणेची सावध सुरुवात

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे