Join us

India vs Australia : दहा वर्षांनंतरही भारतीय कर्णधार नंबर वन

धोनीने ख्रिस गेल, रिकी पॉन्टिंग, युवराज सिंग, माईक हसी, मोहम्मद युसूफ या नामांकित फलंदाजांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:00 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: क्रिकेट जगतामध्ये भारताचे अजूनही वर्चस्व कायम आहे. कारण गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय कर्णधारच नंबर वनला असल्याचे दिसत आहे. 

महेंद्रसिंग धोनी 2009 साली भारताचा कर्णधार होता. त्यावेळी तो एवढ्या भन्नाट फॉर्मात होता की, गोलंदाजांना तो सळो की पळो करून सोडत होता. 2009 साली धोनी 771 गुणांसह अव्वल फलंदाज ठरला होता. यावेळी त्याने ख्रिस गेल, रिकी पॉन्टिंग, युवराज सिंग, माईक हसी, मोहम्मद युसूफ या नामांकित फलंदाजांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता.

सध्याच्या घडीला, म्हणजेच 2019 सालीही भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीच्या खात्यामध्ये 899 गुण आहेत. या यादीमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. यावेळी कोहलीने जो रुट, डेव्हिड वॉर्नर, रॉस टेलर या फलंदाजांना मागे टाकले आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलेच धारेवर धरले होते.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया