Join us  

India vs Australia : ९७८ वन डे सामन्यानंतर टीम इंडियावर प्रथम ओढावली नामुष्की; विराटच्या नावे नकोसा विक्रम

India vs Australia : ऑसी कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 29, 2020 10:50 AM

Open in App
ठळक मुद्देफिंच-वॉर्नर जोडीसमोर भारतीय गोलंदाज पुन्हा अपयशीऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांची शतकी भागीदारीवीरेंद्र सेहवाग-सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी

India vs Australia, 2nd ODI : सलामीच्या सामन्यात लय मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय संघापुढे दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. दुसऱ्या वन डे सामन्यातही नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला. ऑसी कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. ९७८ वन डे सामन्यांत टीम इंडियावर अशी नामुष्की कधी ओढावलीच नव्हती.         

टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संघात बदल करेल असे अपेक्षित होते, परंतु विराटनं तोच संघ कायम राखला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटका बसला आणि मार्कस स्टॉयनिसला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात मोइजेस हेनरिक्सला संधी मिळाली.

वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नवदीप सैनीला टार्गेट करताना वॉर्नरने काही सुरेख फटके मारले. जसप्रीत बुमराहचे अपयश ही खरी टीम इंडियाची डोकेदुखी आहे. वॉर्नरला धावबाद करण्याची संधी भारतीयांनी गमावली आणि त्यानंतर त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. वॉर्नर-फिंचनं सलग दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दरम्यान सलग पाच सामन्यांत भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. इतिहासात प्रथमच भारताची अशी खराब कामगिरी झाली. first time in ODI history, India concede 50+ opening partnership in 5 consecutive innings.वॉर्नर-फिंच - १२३*वॉर्नर-फिंच - १५६मार्टिन गुप्तील-हेन्री निकोल्स - १०६  गुप्तील-निकोल्स - ९३गुप्तील-निकोल्स - ८५  वॉर्नर फिंचनं शतकी भागीदारी केली. फिंचनं ६० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ९७८ वन डे सामन्यांत प्रथमच टीम इंडिविरुद्ध प्रतिस्पर्धी सलामीवीरांनी सलग तीन सामन्यांत शतकी भागीदारी केली.  मार्टिन गुप्तील-हेन्री निकोल्स - १०६  वॉर्नर-फिंच - १५६वॉर्नर-फिंच - १२३*

सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या सलामीच्या जोडीत वॉर्नर-फिंचनं भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  सौरव गांगुली/ सचिन तेंडुलकर - २१शिखर धवन/रोहित शर्मा - १६अॅडम गिलख्रिस्ट/मॅथ्यू हेडन - १६गॉर्डन ग्रिनिज/ डेस्मोंड हायनेस - १५वीरेंद्र सेहवाग/सचिन तेंडुलकर - १२अॅरोन फिंच/डेव्हिड वॉर्नर - १२ 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंच